नवी दिल्ली : केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या या पंचवार्षिकातील पहिला अर्थसंकल्प आज संसदेसमोर मांडला. या अर्थसंकल्पात सरकारने परिवहन, उद्योग, शेती, शिक्षणाचा विकासासह परकीय गुंतवणुक करण्यावर भर दिला आहे.
जाणून घेऊया अर्थसंकल्पातील ३० महत्वाच्या बाबी
१) २०२५ पर्यंत अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य
२) गावातील प्रत्येक कुटुंबाला वीज ,गॅस कनेक्शन देणार
३) इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मोठी सूट
४) अनिवासी भारतीयांना आधार कार्ड देणार
५) दोन कोटी शेतकर्यांना डिजिटल शिक्षण देणार
६)महिला सक्षमीकरणासाठी समिती नेमणार
७) एलईडी बल्बला योजनेला अधिक प्रोत्साहन देणार
८) कामगार नियम अधिक सुलभ करणार
९) स्टार्टअपला प्रोत्साहन
१०) मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी पीपीपी मॉडेल राबवणार
११) नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवणार, उच्च शिक्षणाला चालना देणार
१२) शहरांना जोडण्यासाठी उपनगरीय रेल्वेत अधिक गुंतवणूक करणार
१३) इन्कम रिटर्नसाठी पॅन ऐवजी आधार कार्ड चालणार
१४) २०२४ पर्यंत प्रत्येक घरात पाणी पोहोचवणार
१५) शेतकर्यांना कुशल बनवण्यासाठी झीरो बजेट फार्मिंगला प्रोत्साहन देणार
१६) पाच वर्षांत १.२५ लाख कोटींचे रस्ते बांधणार
१७) कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर अधिक खर्च करणार
१८) मीडियातील परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवणार
१९) विमा क्षेत्रात १०० टक्के परदेशी गुंतवणुकीला मंजुरी
२०) तीन कोटी दुकानदारांना पेन्शन योजना
२१) दररोज १३५ कि.मी. नवीन रस्त्याची निर्मिती
२२) प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी.
२३) उच्च शिक्षणासाठी ४३० कोटी
२४) क्रीडा विकासासाठी बोर्डाची स्थापना
२५) १७ पर्यटनस्थळांना उच्च दर्जाचे बनविणार.
२६) सहकारी बँका सुधारणासाठी ७० हजार कोटी.
२७) २०२२ पर्यंत १.९५ कोटी घरे बांधणार
२८) शेत माल आयातीऐवजी निर्यातीवर भर
२९) स्टार्टअप इंडियासाठी न्यूज चॅनेल सुरू करणार
३०) रेल्वे प्रकल्पासाठी पीपीपी योजनेतून निधी उभारणार